आता असंख्य पर राज्यांमधील लोक त्यांच्या राज्यांत गेल्याने महाराष्ट्रत अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहे, होणार आहे.
यामध्ये शेती माल खरेदी-विक्री मध्ये खूप संधी उपलब्ध होत आहे, होणार आहे.
आपले जे शेतकरी बंधू असतील त्यांचा स्वच्छ शेतीमाल योग्य दराने खरेदी करून ग्राहकांना थेट मिळाल्यास, किंवा मोठया सोसायटीमध्ये 10 भाज्यांची किट घरपोच उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना देखील फायदा होणार आहे शिवाय घरगुती भाजीपाला-शेतीमाल मिळणार.
एखाद्या विभागामध्ये मोठे मित्र मंडळ असतील आणि त्यांना पण समज कार्य करायचे असेल तर काही ठराविक वेळा करिता सकाळी/संध्याकाळी किंवा शक्य असल्यास पूर्ण वेळ छोटी भाजी मंडई उभारू शकता की ज्यामुळे त्या विभागातील लोकांना दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही, सदर भाजी मंडईमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींचे इन्फ्रा रेड तापमान मोजणे, भाजी मंडईचे निर्जंतुकीकरण, जरी त्या करीता थोडे चार्जेस विक्रेत्यांकडून घेतले तरी चालले, व विक्रेत्यांनी भाजीचा दर तेवढे चार्जेस मिळतील एवढा ठेवल्यास त्यांना तोटा होणार नाही, ग्राहकांना देखील स्वच्छ भाजी-पाला मिळेल, भाजी घेताना मनात कोणत्याही संसर्गाची भीती राहणार नाही, हा उपक्रम 100% नियमात राबवला तर याला खूप प्रतिसाद मिळेल.
पेमेंट करण्यासाठी गूगल पे, फोन पे, भीम एप, पेटीएम किंवा इतर माध्यमातून.
मोठया सोसायटीची ऑर्डर करिता सोसायटी मधील कोणत्याही एका व्यक्तीने नियोजन करून (अध्यक्ष/सेक्रेटरी) थेट शेतकऱ्याच्या व्हाट्सएप ऑर्डर करू शकता, किंवा मंडईचे नियोजन पाहणारी व्यक्ती किंवा समूह.
बेरोजगार तरुणांना सुद्धा व्यवसाय करण्यास संधी उपलब्ध.
घरपोच भाजी पोहच करणे-ऑर्डर घेणे, ऑर्डर शेतकऱ्यांना देणे, किंवा मंडईचे नियोजन पाहणारी व्यक्ती किंवा समूह यांना व्हाट्स एप माध्यमातून देणे.
यात आपल्याला काही सहभाग नोंदवायचा असेल तर नोंदवू शकता. ही फक्त सुरुवात करण्यासाठी मत मांडले.
यात आपल्या देखील काही सहभाग घेता येत असेल तर नक्की घ्यावा. कोणतेही काम उच्च किंवा कमी नसते. आणि हे काम अत्यावश्यक सेवेत येते हे प्रत्येकाला नक्कीच माहिती असेल. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेचे काम करत आहोत. कामाची लाज जो बाळगतो त्याचे भविष्य अंधकाराकडे जाणारे असते.
-प्रा.सचिन बिबवे.
कळस बु, ता.अकोले, जिल्हा. अहमदनगर.
मोबाईल नं. 992286767
No comments:
Post a Comment