Engineering

“शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया राज्य पातळीवर एमएचटी-सीईटी  (MHT-CET) या सामायिक प्रवेश परीक्षेच्या आधारे होणार.”

१. राज्यातील विविध अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी (MHT-CET) ही एकच सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून घेण्यात येईल.

२. सदर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेकरीता विद्यार्थी एकच प्रवेश परीक्षा अर्ज सादर करतील.

३. अभियांत्रिकी/ औषधनिर्माणशास्त्र/ वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र (प्रत्येकी ५० गुण) या दोन्ही विषयांची प्रश्नपत्रिका सामाईक असेल. तथापि, गणित (१०० गुण) जीवशास्त्र (१०० गुण) या विषयांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील.

४. राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा एमएचटी-सीईटी (MHT-CET) ही राज्य परीक्षा मंडळाच्या इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर असेल.   

. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता गुणवत्ता खालीलप्रमाणे राहील:

) राज्यस्तरीय सामायिक प्रवेश परीक्षेत (एमएचटी-सीईटी) प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.

) सामायिक प्रवेश परीक्षेतील (एमएचटी-सीईटी) गुणांच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र गुणवत्ता याद्या तयार करण्यात येतील.

(१) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल.

(२) औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित/जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल.

(३) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची गुणवत्ता यादी सामायिक प्रवेश परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या तीन विषयांच्या गुणांवर तयार करण्यात येईल.

क) अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्याने राज्य परीक्षा मंडळ किंवा समकक्ष मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित हे अनिवार्य आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान/टेक्निकल व्होकेशनल यापैकी एक विषयात मिळून एकूण किमान ५० टक्के (मागासवर्ग शारिरीक विकलांग विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के) गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. तसेच औषधनिर्माणशास्त्र वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी संबंधित समूचित प्राधिकरणांनी (मेडीकल काऊन्सिल ऑफ इंडिया, नर्सिंग काऊन्सिल . सारख्या) विहीत केलेल्या पात्रतेच्या निकषांची पूर्तता करणे आवश्यक असेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेताक २०१५०८२९१०३६३४९५०८ असा आहे.

-प्रा.सचिन बिबवे. 
अकोले.

 ................................................................................................................

JEE Main 2015 Cut-off for JEE Advanced:

OPEN:105

OBC:70

SC:50

ST:44

GEN-PWD:19

अभियांत्रिकी प्रवेश कागदपत्र:

१. १२ वी गुणपत्रक सत्यप्रत

२. जेईई मेन गुणपत्रक सत्यप्रत 

३. जात प्रमाणपत्र (SC,ST,OBC Students Only)

४. जात वैधता (OBC Students Only)

 

 JEE MAIN 2015 Information Broucher

(Old Broucher only for reference) 

 

......................................................................................

इंजिनिअरिंगनंतरचे अभ्यासक्रम

हॅकिंग ऍण्ड सायबर सिक्‍युरिटी ः सायबर सुरक्षा हा तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातील परवलीचा शब्द बनला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने आपले आयुष्य सुखकर बनले असले तरी या तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तीही वाढल्या आहेत. या प्रवृत्तींना चाप बसवण्याकरिता वेगवेगळे उपाय शोधले जात आहेत. आपल्या संगणकात, लॅपटॉपमध्ये तसेच स्मार्ट फोनमध्ये असलेली महत्त्वाची माहिती चोरण्याचे तंत्रज्ञान सायबर गुन्हेगारांकडून विकसित केले जात आहे. एखाद्याची बॅंक खात्याविषयीची गुप्त माहिती तसेच ऑफिसच्या कामकाजासंदर्भातील गोपनिय माहिती तंत्रज्ञानाद्वारे चोरून त्याचा गैरवापर करण्याचे प्रकार वेगाने वाढत आहेत. एखाद्याच्या बॅंक खात्यातील रक्‍कम परस्पर काढून घेणे, यासारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठीचे तंत्रज्ञान या अभ्यासक्रमात शिकविले जाते. संगणक, लॅपटॉप आणि स्मार्ट फोनमधील गोपनिय, महत्त्वाची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागू न देण्याकरिता कोणकोणत्या सॉफ्टवेअरचा कसा वापर करावा, याचे शिक्षण या अभ्यासक्रमात उमेदवाराना दिले जाते. इथिकल हॅकिंग, वेब ऍप्लिकेशन सिक्‍युरिटी, नेटवर्क सिक्‍युरिटी, पेनिट्रेशन टेस्टिंग, फॉरेन्सीक्‍स आदी गोष्टींचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. कंपन्या, व्यक्‍ती आणि संस्था यांच्या डाटा सिक्‍युरिटी सिस्टिममधील दोष शोधण्यासाठी सायबर गुन्हेगार प्रयत्नशील असतात. इंडियन स्कूल ऑफ इथिकल हॅकिंगकडून अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवले जातात. द इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी या संस्थेकडून मुंबई, चंदिगड आणि पुणे येथे अशाच प्रकारचा अभ्यासक्रम शिकविला जातो.
सायबर सिक्‍युरिटी निंजा ः इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकता येतो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेतील दोष शोधण्याचे आणि त्यावर मात करण्याचे शिक्षण दिले जाते. सायबर गुन्हेगारांपासून आपली महत्त्वाची माहिती कशी सुरक्षित राखता येईल याचे शिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते. हे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा सहजपणे लाभ घेता येईल.
इआरपी आणि एसएपी ः एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभियांत्रिकीच्या पदवीधारकांना उपयुक्‍त ठरणार आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबरोबरच “सॅप’मधील स्पेशलायझेशनही उपयुक्‍त ठरते. यामुळे एखाद्या कंपनीच्या किंवा संस्थेच्या कामकाजात सॉफ्टवेअरचा वापर करून कार्यक्षमता कशी आणायची याचे शिक्षण उमेदवारांना मिळते. छोट्या आणि मध्यम आकारांच्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा अधिकाधिक वापर कसा करून घेता येईल याचे शिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे उमेदवारांना मिळते. कंपनीतील वित्तपुरवठा, कंट्रोलिंग, मनुष्यबळ विकास, विक्री, वितरण, मटेरिअल मॅनेजमेंट, वेअर हाऊस, उत्पादन, सुरक्षा आणि संशोधन अशा जवळपास सर्वच विभागांमध्ये “इआरपी’ आणि “सॅप’ या प्रणालींद्वारे नियंत्रण ठेवता येते. हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनेक संस्थांद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिकवले जातात.
कॉम्प्युटरच्या अनेक भाषा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, हार्डवेअर अशा अनेक विषयात अभियांत्रिकी पदवीधारकांना शिक्षण घेता येते. सी ञ्च, जावा, ओरॅकल, वेबडिझाईन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अशा अनेक विषयांतील अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. या संस्थांकडून या विषयांचे प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑनसाईट प्रोग्रामद्वारे दिले जाते. गुजरातमधील सौराष्ट्र विद्यापीठ, मुंबईतील के.जे.सोमय्या, डी.जे. संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यासारख्या संस्थांतून या भाषांचे तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे शिक्षण दिले जाते. संगणकाशी संबंधित असलेले हे अभ्यासक्रम अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्‍त ठरतात. पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातही हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम शिकविले जातात. एमआयटी महाविद्यालयात सीएइ ऍण्ड स्टायलिंग, कॉम्प्युटर एडेड डिझाईन यासारख्या विषयातील सॉफ्टवेअर तयार करण्याचे शिक्षण दिले जाते.

 

2 comments: