23 Sept 2017

Secrets of success: यशाचे रहस्ये.

 Secrets of success: 

यशाचे रहस्ये:  


1. Set your goals. What do I want to do, what to do, where to go, what to get, today, right now, decide immediately
१. तुमचे ध्येय निश्चित करा. मला काय करायचयं, काय व्हायचयं, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा.

2. Try it in that way, list who can help, who will accompany, what books will be read, anyone who needs to cooperate. Meet them. Get those things.
२. त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.

3. Do nothing in the end your way to success. There were calamities, problems arose, opposed, insulted, someone kept their names, pulled their legs, jokingly joking, stopped, stopped, whatever. Be blameless in good deeds. Honor, ego, greatness, ego leave all. Just remember to attain the training. Go to reach the goal.!
3. काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे. !!

4. Do not rely on anyone. Do it yourself
4. कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.

5. I am poor I have No money. This is not. They do not. People do not help but they take advantage of compulsions. Strengthen Yourself. Not forced
5. मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही.

6. Have a good relationship with everyone. You have more enemies in the organization, party, caste, region, where you are, These people play games inside. And sometimes people who are outsiders who you think are enemies, help them suddenly. So do not believe anyone in the fight. Put aside what you do not think about, and take what you think is a friendship. Great leaders, senior leaders of the organization behave and succeed.
6. सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शत्रू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे ज्यांना आपण शत्रू मानतो ते लोक आपली अचानक मदत करतात. त्यामुळे शत्रू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे विचार पटतात ते घेऊन मैत्री करा. मोठे पुढारी, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.

 7. Do not look at anyone's caste. Make a person who is capable, clever, virtuous, Polite, so anyone who has it. Consider him as your
7) कोणाची जात पात पाहू नका. जो कर्तृत्ववान, हुशार, सद्गुणी, नीतिवंत मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. त्याला आपले माना.

8. Who says good things about you, thinks about your good Consider such a person your guru. So do not think that he is younger or big. Insulted such a good person, angry on you or leave, but do not leave him. Because there are many robbers with greatness but there are very few who show you the path. Find a single moon than to find thousands of stars and Keep a single sun closer than finding a thousand moon
8. जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला, रागावले, लाथाडले तरी त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.

9. Think about everything in three directions
     1. Is this my welfare?
     2. There is no selfishness to say this?
      3. Is that right?
      Think about these three sides. And felt that the person in front of me thought about my good. It does not have any interest in it and only if I have the advantage of it, then cover it with my eyes.
9. प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
     १. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
     २. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
      ३. हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.

10. Keep the feet on the ground. keep relationships as a man with man. Then Success will fall into your path.
10. पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. तेंव्हा यश तुमच्या पायात लोळण घेईल


How to behave in a personal life ??
वैयक्तिक जीवनात कसे वागावे.??

1) Wake up from sleep in the early in morning before sunrise.
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..

2) Do A little bit of exercise everyday.
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच.

3) Bath possibly with cold water.
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा.

4) Take a look at those who are ideal.
Eg. Grand parents, parents etc.
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. महामानव, आईवडील इत्यादी

5) Make breakfast, eat at home. Do not eat anything on the hotel, in the hotel. Do not drink. Eat fruits if needed.
५) नाष्टा, जेवण घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.

6) Feel free to leave home. Work with a happy heart.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा

 7) Honor the co-workers and those who are working under their control.
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा.

 8) While driving, do not use mobile phones while walking on the road. Put the headphone in the ear while standing in a place.
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.

9) Limit the use of Facebook, whatsapp. Make a profit from it. Timepass has gone to life. Now pay attention to the career.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे. आता करिअर कडे लक्ष द्या.

10) Do not insult parents, parents, and teachers.
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.

 11) Throw away bottle bottles like those who come near to drink alcoholic beverages.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मित्रांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका

12) Do not stand close to the friends, feet, and friends, and look away at the time of the crisis.
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मित्रांना पायाजवळही उभे करू नका.

13) Do not make any addiction. Leave it if you have And if not Do not go to that way. People who try to add you to drugs can not be your friends.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मित्र असूच शकत नाहीत.

14) Students should study regularly daily. Those who are not students should read daily.
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर, अभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे.

15) Look better programme on TV.
१५) टी.व्ही. व चित्रपटात चांगले ते पहावे.

 16) Do not argue with anyone. Leave it unchanged, but do not waste time
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका

17) Possibly avoid meat intake, the bread of the house is the nectar.
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.

 19) Do Ayurvedic treatment than medical in sickness.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा

 20) If possible, add pranayama, Surya Namaskar every day.
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला.

 21) Sleep early. Wake up early.
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा.

22) Avoid bad things. accept good things. 
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.

23) Avoid failure. Achieve success Think on it..
२३) अपयश टाळा. यश स्विकारा. विचार करा...

If you decide, then act.
पटले तर कृती करा.

No comments:

Post a Comment